विषय «चळवळ»

फलज्योतिष“शास्त्र?”

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच.

पुढे वाचा

रेषा आणि कविता…!

अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून 
दाखवत फिरतो हाताच्या रेषा 
वाळूचे कण रगडण्याचे सोडून 
दिसरात जपतो दगडाचे नाव 
घाम गाळायच्या ऐवजी 
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं 
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!

सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना 
राजा शांतपणे करत होता यज्ञ 
शत्रू महालाजवळ आले असतानाही 
राजा करत राहिला मंत्रांचा जाप 
पराभवाची फिकीर सोडून 
तो देत राहिला जांभई 
शेवटी बंदिस्त झाल्यावर, 
“छाटण्यात यावे माझे हात” 
अशी याचना करत राहिला…!

उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती 
माझी लायकी ठरवून 
ते घट्ट ठेवतात पाय बांधून 
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे 
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात 
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत 
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे 
त्यांचं पोट भरल्यावर 
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!

पुढे वाचा

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे

पुढे वाचा

शेतकरी पारतंत्र्य दिवस

आपण ज्या महात्म्यांचा आदर करतो, त्यांची पुस्तके वाचत नाही, त्यांच्या वचनांचे आचरण करीत नाही. ज्या ग्रंथांबद्दल श्रद्धाभाव असतो, ती आपण वाचलेली नसतात. अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे अध्ययन केलेले अभावानेच दिसून येते. पण त्या महात्म्यांबद्दल किंवा धर्मग्रंथांबद्दल कोणी ब्र काढला तर त्यांचे अनुयायी अक्षरश: तुटून पडतात. धर्मग्रंथ आणि महात्मे यांच्याबाबत जी विसंगती दिसून येते, तशीच विसंगती भारतीय राज्यघटनेबद्दलदेखील दिसू लागली आहे. घटनेविषयी आणि कायद्याविषयी काही कळत नसले तरी ‘खबरदार’ वगैरे भाषा वापरली जाते. या श्रद्धाभावाचा अनेकजण गैरफायदा घेतात.

मी एका सभेत लोकांना विचारले की, “तुमच्यापैकी किती जणांनी भारतीय राज्यघटना वाचली आहे, कृपया हात वर करा.”

पुढे वाचा

माफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही!

इंग्रजी पोर्टल scroll.in यावर १७ जून रोजी “As China’s Communist Party t­­urns 100, Indian leaders would do well to learn from its success” या शीर्षकाचा श्री. सुधींद्र कुलकर्णी यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे. “चीनच्या शतायुषी पक्षाकडून भारतानं काय शिकावं ?” या शीर्षकाखाली त्याचा अनुवादही आता उपलब्ध आहे. लेखाचा दोन-तृतियांश भाग चीनने केलेल्या देदीप्यमान प्रगतीचा आढावा आहे. उरलेल्या एक-तृतियांश भागात भारताने ‘चिनी कम्युनिस्ट पक्षा’कडून कोणते पाच धडे शिकायला हवेत ते सांगितले आहे. कुलकर्णी हे भाजपच्या पहिल्या सरकारात महत्त्वाची भूमिका सांभाळत होते तसेच ते डाव्या विचारसरणीचेही मानले जातात. त्यामुळे, भारतासमोरील प्रश्नांकडे पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता सारासार विचार करूनच त्यांनी आपले मत मांडले आहे असे मानणे उचित होईल.

पुढे वाचा

आमच्यासाठी? आमच्या सहभागाशिवाय?

आमच्यासाठी? आमच्या सहभागाशिवाय?

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर असणार्‍या मध्यप्रदेशातील पारडसिंगा गावातील शेतकर्‍यांनी हा प्रश्न उभा केला आहे. थेट शेतकर्‍यांच्या तोंडून आलेल्या ह्या प्रश्नांना धोरणे बनवणार्‍या राज्यकर्त्यांसमोर आणण्यासाठी आंदोलकांनी निवडलेले हे एक वेगळेच माध्यम!

नवीन तीन कायदे आमच्या हिताचे आहेत असे आम्हांला सांगण्यात येते आहे. पण कायदे पारित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. मग आमच्या सहभागाशिवाय आमच्या हितासंबंधी निर्णय घेणं लोकशाहीच्या संकल्पनेच्या विरोधात नाही का? कायद्यांना विरोध असण्यामागे हेच आमचे मुख्य कारण आहे. आम्ही हा विरोध करीत राहू. वाईट एकच वाटते की स्वतःची ‘मन की बात’ सांगणारे हे सरकार आमची ‘मन की बात’ ऐकायलाच तयार नाही आहे.

पुढे वाचा

नव्या कृषी विधेयकांचा भूलभुलैया

आपला देश कोविद १९ महामारीच्या तीव्र लाटेत वेढला असतांनाच्या काळात केंद्र सरकारने तीन नवी कृषी विधेयके संसदेत घाईघाईने मंजूर करून घेतलीत. त्यामुळे या विधेयकांविरुद्ध देशातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलनाद्वारे आपला विरोध नोंदविला. या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा अंतिमत: फायदाच होणार आहे हे जे केंद्रसरकारतर्फे सतत सांगितले जात आहे ते निश्चितच संशयास्पद आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या बदलांची कोणतीही मागणी केलेली नसतांना आणि त्यांना विश्वासात न घेता केंद्रसरकारने हे बदल घडवून आणलेत. शेती हा विषय राज्यसरकारांच्या अधीन असूनही केंद्रातील सरकारला त्यांच्याशी सल्ला मसलतीची गरज भासली नाही.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

पुढे वाचा

राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता

निरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.

पुढे वाचा

पुन्हा-पुन्हा घडणारे अघटित

२५ मे २०२०. घटना तशी नेहमीची होती. मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाची हत्या झाली. जॉर्ज फ्लॉईड असहाय्यपणे ‘मी श्वास घेऊ शकत नाही’ असे सांगत असताना इतर ३ अकृष्ण पोलीस नुसते पाहत असतात पण डेरेक चौहीनला जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून खून करताना थांबवत नाहीत. हा प्रकार केवळ दहा पंधरा सेकंद चालला नाही तर जवळजवळ नऊ मिनिटे चालला. पाचशे सेकंदांपेक्षाही अधिक. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा जास्त वेळ.

खरेतर हा नेहमीचाच प्रकार आहे. अशा प्रकारे पोलीसांद्वारे थोड्याफार फरकाने अनेक हत्या याआधीही झाल्या आहेत.

पुढे वाचा