विषय «पुस्तक परीक्षण»

सिनेमाकडे पाहण्याची निर्मम दृष्टी देणारा ‘सिनेमा पाहणारा माणूस’

अशोक राणे हे नाव चित्रपटशौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करीत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.

चित्रपटजगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यातून त्यांची कारकीर्द वेगळ्या दिशेने घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक आणि विशाल असे परिमाण प्राप्त झाले.

पुढे वाचा

आय डू व्हॉट आय डू

‘आय डू व्हॉट आय डू’ डॉ. रघुराम राजन यांचे आज गाजत असलेले पुस्तक. ते वाचून मला लिखाण करावेच लागले.’….मार्च २०१८

मला अर्थशास्त्रामध्ये कसा काय रस उत्पन्न झाला ते आठवत नाही. पण जॉन केनेथ गालब्रेथ यांची ‘इंडस्ट्रियल सोसायटी’, ‘पॉवर’ यांसारखी गाजलेली काही पुस्तके वाचल्यापासून तो विषय समजायला आणि म्हणून आवडायला लागला. नंतरही अनेक अर्थतज्ज्ञांची पुस्तके जेवढी जमतील तेवढी वाचली आणि त्यातून माझी एक समज घडत गेली. आर्थिक विकासाच्या संदर्भात नागरी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण ‘नांगरी’ अर्थव्यवस्था (आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’मधील भावलेली ही व्याख्या) यांबाबत थोडा अभ्यास केला होता.

पुढे वाचा

भरकटलेल्या अर्थव्यवस्थेचे दशक

भारतामधील निवडणुकीचा गदारोळ आता संपला आहे. निवडणुकीच्या वादळाने उडविलेला विखारी आणि अतिशय वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला प्रचाराचा, आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा खाली बसेल, भडकलेल्या भावना आणि तापलेले वातावरण आता थंड होऊ लागेल अशी आशा आहे. मागील दहा वर्षांत देशामध्ये घडलेले राजकीय स्थित्यंतर, या काळात देशाची आर्थिक प्रगति-अधोगती समजून घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. राजकीय ध्रुवीकारण बाजूला ठेवून वर्तमानातील आर्थिक आह्वाने समजून घेण्याची ही वेळ आहे.

मुख्य आणि तातडीचा विषय आहे तो भारताच्या आर्थिक स्थिति-गतीचा लेखाजोखा मांडण्याचा. ताळेबंद समजून घेण्याचा. निवडणुकीच्या वातावरणात सत्ताधारी पक्षाने अर्थव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या गंभीर समस्यांचा चुकूनही उल्लेख केला नाही.

पुढे वाचा

पुस्तक परिचय : द सर्कल

कादंबरी, तंत्रज्ञानाचा सामाजिक परिणाम, मानवी स्वातंत्र्य
——————————————————————————–
1984 हे वर्ष उलटून गेले, पण जॉर्ज ऑर्वेलने दाखविलेला एकाधिकारशाहीचा धोका अजून टळला नाही. उलट तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व सोयीसाठी आपले स्वातंत्र्य गहाण टाकण्याच्या वाढत्या मनोवृत्तीमुळे तो धोका अधिकच गडद होत आहे. तंत्रज्ञान व विकास हे परवलीचे शब्द मानणाऱ्या आपल्या आधुनिक समाजाला धोक्याचा लाल कंदील दाखविणाऱ्या एका आशयघन कादंबरीचा हा संक्षिप्त परिचय.
—————————————————————————–

‘द सर्कल’ या कंपनीची सुरुवात ‘टाय’ने (तिच्या तीन संचालकांपैकी एक) लावलेल्या ‘ट्रू यू’या सॉफ्टवेअरच्या शोधापासून होते. ह्या सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना फक्त एका अकाऊन्ट आणि पासवर्डमार्फत त्यांच्या संपूर्ण सामाजिक आणि खाजगी आयुष्याचे व्यवस्थापन करण्याची सोय उपलब्ध होते.

पुढे वाचा

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्‍न केला आहे.

पुढे वाचा

नवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत

कुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि त्यामुळे हा माणूस अधिकओळखीचा आणि आपला होत जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने त्यांना `कुमारभाऊ’ ही दिलेली पदवी अधिकच सार्थ वाटू लागते. त्यातून जनतेशी असणारे त्यांचे जैव नाते प्रकर्षाने पुढे येते.

पुढे वाचा

देव-धर्मवेड्या समाजाचं व्यंगचित्र

‘देवनगरीत शेजाऱ्यावर प्रेम करणारे कमी आहेत, त्यामानानं शेजाऱ्यांच्या मांजरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांजरवेडय़ांना इथे शहाणं समजलं जातं, मात्र अशा या प्रात:स्मरणीय मांजरांना देवनगरीत हमरस्त्यावर यायला बंदी आहे. कारण मांजरं माणसांना आडवं जाऊन त्यांचा खोळंबा करतात, ही सामूहिक श्रद्धा. देवनगरीत एकदा एक माणूस साप चावून मेला. त्याला जिवंत करण्यासाठी इथला सुप्रसिद्ध मांत्रिक लगबगीनं निघाला, पण वाटेवर मांजर आडवं गेलं म्हणून मेलेला माणूस जिवंत होऊ शकला नाही.. कामं उरकण्याचा कंटाळा करणाऱ्या देवनगरीच्या माणसांना मांजरं खूप आवडतात, असंही माझं निरीक्षण आहे..’
‘ईश्वर डॉट कॉम’ या विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीतला हा एक परिच्छेद.

पुढे वाचा

त्रुटित जीवनी..

जनतेच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी खर्ची पडत असतात. काय घडत आहे यापासून सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते आणि याची त्यांना जाणीवदेखील नसते.”

– नोम चोमस्की

व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट) उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या मूल्यात वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करुणेची अवहेलना वृद्धिंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क (सॅच्युरेटेड ड्रायनेस) होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे.

पुढे वाचा

‘मर्मभेद’च्या निमित्ताने, आमच्या विषयाची स्थिती

मर्मभेद हा ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे.पुं.रेगे ह्यांनी लिहिलेल्या टीकालेखांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपादक आहेत प्रसिद्ध साहित्यिक एस्.डी.इनामदार. ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, तज्ज्ञांनी तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि धर्म इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचे, लेखांचे रेगे सरांनी केलेले परीक्षण, त्याला काही लेखकांनी दिलेली उत्तरे तसेच रेगे सरांनी केलेला खुलासा समाविष्ट आहे. रेगे सरांचे लेख प्रामुख्याने नवभारत या वैचारिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. १९६२ ते १९९९ असा सदतीस वर्षांचा हा कालखंड आहे.

ज्या ज्या वेळी हे लेख प्रसिद्ध झाले त्या त्या वेळी टीकेचा विषय झालेल्या काही ग्रंथकारांनी आणि लेखकांनी त्याला उत्तरेही दिलीत.

पुढे वाचा

लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा एक थोर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता हे किती जणांना माहीत असेल?
सर्वांत प्रसिद्ध असतील तर त्याची शास्त्रीय संशोधने! त्याच्या चित्रांच्या पसाऱ्यात, अनेक यंत्रांच्या, काही नुसत्या यंत्राच्या प्रयोगात्मक कल्पना तर काही पूर्णपणे विकसित केलेल्या यंत्रांचे आराखडे आणि नोंदी सापडतात.

पुढे वाचा