विषय «शिक्षण»

ग्राउंड झीरो: जे एन यु

जे एन यु, देशद्रोह, शैक्षणिक स्वातंत्र्य
—————————————————————————–
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ — जे एन यु – सर्वत्र गाजते आहे. तेथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार ह्याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेली अटक, तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकिलांनी त्याच्यावर चढवलेला हल्ला, काही दूरचित्रवाहिन्यांनी व संसेदेच्या व्यासपीठावरून खुद्द सत्ताधारी पक्षाने जेएनयुची देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून केलेली संभावना व्यथित करणाऱ्या आहेत. सादर आहे ह्या घटनाक्रमाचा जेएनयुत जाऊन मुळापासून घेतलेला आढावा.
—————————————————————————–
नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

पुढे वाचा

आत्मशोधार्थ शिक्षण

शिक्षणव्यवस्था, आत्मशोध, युवकांना आवाहन
—————————————————————————–
शिक्षण स्वतःचा शोध व समृद्धी ह्यांसाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी कसे उपयोजित करता येईल, विद्याशाखांमधील कृत्रिम भिंती कशा तोडता येतील, शिक्षणक्षेत्रात प्रेरणा व स्वातंत्र्य ह्यांचे महत्त्व काय, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत व त्याला स्वानुभव जोडत आंतरराष्ट्रीय एका युवा विख्यात शास्त्रज्ञाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद.
—————————————————————————–
तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल की दीक्षान्त संदेशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये शुभारंभाचे भाषण म्हणतात. विविध विषयांतील स्नातकहो, पदवी प्राप्त करून आज तुम्ही बाहेरच्या जगात स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी, स्व-गुणवत्तेच्या बळावर व्यक्ती म्हणून उत्क्रांत होण्यासाठी, जीवनात नव्या वाटेवर शुभारंभ करण्यासाठी पाऊल टाकत आहात.

पुढे वाचा

‘योगा’वर दावा कुणाचा?

 भारतासाठी जसे ‘मॅक्डोनाल्ड’ तसे उत्तर अमेरिकेसाठी ‘योगा’. दोन्हीही मूळ स्थानापासून दूर परदेशात पक्के रुजलेले. अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण परिसरातील व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, चर्चेस अगदी सिनेगॉग्समध्येही योगाचे शिकवणी वर्ग चालू असतात. अमेरिकेतील जवळपास सोळा लाख लोकांच्या दररोजच्या व्यायाम प्रकारात योगाच्या कोणत्या ना कोणता प्रकाराचा समावेश असतोच. त्यामुळे दररोजच अमेरिकेतील लोक योगाबद्दल काही ना काही बोलत असतात, अर्थात व्यायामाच्या अंगाने. त्यांच्या व्यायामात शरीराला ताण देणारे, श्वासोच्छ्वासाचे किंवा आसनाचे हठयोगी व्यायाम प्रकार मुख्यत: असतात. ही आसने शिकविण्यासाठी बी.के.एस. अय्यंगार अथवा शिवानंद यांच्या पद्धतीने शिकविणारे, पट्टाभी जोईस यांचा ‘अष्टांग विन्यासा’ किंवा ‘पॉवर योगा’ शिकविणारे किंवा नुकताच ‘हॉट योगा’चा कॉपीराईट मिळविणारे बिक्रम चौधरी यांच्या पद्धतीने शिकविणारे भारतीय मूळ असलेले शिक्षक असतात.

पुढे वाचा

जिकडे पैसा जास्त तिकडे आयाआयटीयन्स

मागच्या आठवड्यात बेंगळुरूमधील आयआयएसच्या पदवीदान समारंभात इन्फोसिसचे एक संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वोत्तम शिक्षणाचा दावा करणाऱ्या आयआयटी व आयआयएम या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी काय संशोधन करतात, यावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. एकप्रकारे त्यांनी उच्चशिक्षणाचं ऑडिटच केलं आहे. नारायण मूर्ती यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याची कारणं माझ्या दृष्टिकोनातून अशी आहेत की, आयआयटीमधून बाहेर पडलेले बहुसंख्य विद्यार्थी परदेशात गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या नोकऱ्या स्वीकारल्या, त्या सगळ्या रुटीन स्वरूपाच्या होत्या. त्यात स्वतंत्र संशोधनाला फारसा वाव नव्हता. तिथेसुद्धा विद्यापीठांमध्ये फार कमी जण गेले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर

पुढे वाचा

आंबेडकर नावाची एवढी भीती का?

आयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.
आंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही.

पुढे वाचा

शिक्षणाचा सत्यानाश

एनडीए सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाच्या पदांवर केलेल्या निर्बुद्ध चमच्यांच्या नेमणुकींमुळे शिक्षणक्षेत्राच्या हो घातलेल्या हानीबद्दल धास्ती वाटणे साहजिकच आहे. पण व्यवस्थेला भेडसावणारी ही एकमेव बाब असल्याचे मानायचे कारण नाही. भांडवल-जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाचा विनाश करू पाहणाऱ्या प्रक्रियांची जी मालिका सुरू होते त्यामध्ये भारतीय संदर्भात जमातवादी फॅसिझमचा शिक्षणक्षेत्रात शिरकाव हा एक अधिकचा, पण महत्वाचा, घटक आहे एवढेच. सत्यानाश प्रक्रिया, तिच्या `का व कसे’ सांगणाऱ्या सांगोपांग स्वरूपात समजून घ्यायला हवी. टेरी इगल्टन या ब्रिटिश वाङ्मय सिद्धांतकाने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. द. कोरियाच्या भेटीदरम्यान एका विद्यापीठाचा सीईओ (हल्ली विद्यापीठाच्या प्रशासकीय प्रमुखाला असे म्हणण्याचा प्रघात आहे) त्याला विद्यापीठ दाखवत असतो.

पुढे वाचा

‘मानव विकास अहवाला’त भारत

गाझा पट्टीत होत असलेल्या मानवी हक्क हननाविरुद्ध ‘युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स काऊन्सिल’ ने मांडलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने ज्या दिवशी मतदान केले त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २३ जुलै २०१४ रोजी ‘जागतिक मानव विकास अहवाल- २०१४’ प्रसिद्ध झाला. दर वर्षी प्रसिद्ध होणारा हा ‘मानव विकास अहवाल’ म्हणजे जगातील प्रत्येक देशासाठी स्वत:ला आरशात न्याहाळून घेण्याची एक संधी असते. देशाची स्थिती-गती काय आहे ते समजून घेता येणे शक्य होते. देशहिताच्या दृष्टीने अग्रक्रमाने कोणती पावले उचलायला हवीत हेही कळते. मागच्या दोन दशकांत मानव विकासाच्या आघाडीवर भारताची जी वाटचाल सुरू आहे ती कितपत समाधानकारक आहे?

पुढे वाचा

शैक्षणिक गुणवत्ता मानसिकतेत रूजायला हवी !

दोन हजार साली ‘डकार’ येथे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘गुणवत्ता’ हा शब्द शिक्षणाच्या संदर्भात प्रथम वापरला गेला. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच त्यातील गुणवत्ता वाढवणे याचा उल्लेख परिषदेच्या शेवटी जाहीर केलेल्या निवेदनात होता. जे शिक्षण मुलांच्या अध्ययनविषयक गरजा भागवते आणि त्यांचे जीवन समृद्ध बनवते, तेच गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी व्याख्या त्यावेळेच्या अहवालात केली होती.

‘डकार’ परिषदेच्या नंतर भारतीय केंद्र सरकारने प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील शिक्षणतज्ज्ञांची कॅबेट (CABET) समिती बनवली होती. या समितीची जबाबदारी नवीन ‌शैक्षणिक धोरण, कायदा व आराखडा यांचा दस्तऐवज करणे ही होती.

पुढे वाचा

मन केले ग्वाही (भाग ३)

पिठामिठाचे दिवस

एकोणीसशे पासष्ट-सहासष्टमध्ये अनेक भारतीय लोक एक सेक्युलर उपास करू लागले. तृणधान्यांची गरज आणि उत्पादन यांत साताठ टक्के तूट दिसत होती. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी सुचवले, की सर्वांनी जर आठवड्यात एक जेवण तृणधान्यरहित केले तर तृणधान्ये आयात करावी लागणार नाहीत. हे म्हणणे बहुतांश भारतीयांना पटले, आणि ‘शास्त्री सोमवारा’चे व्रत सुरू झाले. आजही अनेक जण करतात, म्हणे.

त्याकाळी, आणि अगदी १९८० पर्यंत भारतीय अन्नोत्पादनावर बराच जाहीर खल केला जात असे. टीका, त्रागा, विनोद, अनेक अंगांनी चर्चा होत असे; उदा. ‘पावसाळा बरा आहे.

पुढे वाचा