विषय «पत्र-पत्रोत्तरे»

अवास्तव अपेक्षा

स्वायत्त म्हणजे स्वतःवर अवलंबून, स्व-तंत्र! या अर्थाने निवडणूक आयोग, न्यायसंस्था किंवा कोणतीही स्वायत्त म्हटली जाणारी यंत्रणा खरोरच स्वायत्त असू शकेल का हा प्रश्न विचार करण्यासारखा आणि कळीचा म्हणावा असा आहे. सत्तेत असलेल्या सरकारकडून या सर्व यंत्रणांचे प्रमुख नेमले जातात. तेथे नेमणूक करतांना पात्रतेबरोबरच त्या व्यक्तीचा आपल्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम होणार नाही ना याचा विचार सरकारकडून केला जात असेल की नाही याचे उत्तर सांगायची आवश्यकता आहे काय? या स्वायत्त यंत्रणा सरकारकडून मिळत असलेल्या पैशावर चालतात. आता सरकार पैसा जनतेचा देते, पदरचा देत नाही हे खरे पण तो कररूपाने गोळा करण्याचा, त्याचा विनियोग कसा करायचा हे ठरविण्याचा अधिकार घटनेने सरकारला दिलेला असतो आणि त्याच्यावर दैनंदिन नियंत्रण सरकारकडून ठेवले जाते ना?

पुढे वाचा

मला भेटलेले गांधीजी

गांधीजींची माझी पहिली आठवण ३० जानेवारीची आहे. वर्ष १९८८. मी शाळेत होतो. प्राथमिक चौथीचा वर्ग. आईनं शाळेत जाण्यापूर्वी सांगितलं, “आज हुतात्मा दिन आहे. सकाळी अकरा वाजता भोंगा वाजेल. रस्त्यावर, जिथे कुठे असशील तिथे तसाच उभा राहा.” “कशासाठी?” मी विचारलं. “गांधीजींची स्मृती म्हणून,” तिनं सांगितलं. अकरा वाजता भोंगा वाजला. मी होतो तिथे रस्त्यात उभा राहिलो. ही गांधीजींची पहिली आठवण. गांधीजी यानंतर लवकर भेटले नाहीत. आता तीस जानेवारीला अकरा वाजता भोंगा वाजतो का? माहीत नाही. बऱ्याच वर्षांत ऐकला नाही. गांधीजी नाहीत. आईही नाही.

पुढे वाचा

दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… ?

भारतात बहुतांश आदिवासी समुदाय आहेत. त्यापैकी फासेपारधी हा एक समाज. हा समाज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. फासेपारधी समाजातल्या माणसांवर आत्ताही हल्ले होतात. पोलिसांकडून आणि न्यायव्यवस्थेकडून वेळोवेळी छळवणूक होत राहते. त्यात आता आणखी भर म्हणजे बेड्या-तांड्यांपासून जवळ असणाऱ्या गावातल्या लोकांकडून होणारा अत्याचार.

चार महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. टिटवा बेड्यावरच्या दोन पारधी तरुणांना बाजूच्या गावातल्या लोकांनी खूप मारलं. गावात वीजपुरवठा करणारी डीपी जाळून टाकली. सहा महिने बेड्यावरची बाया-माणसं, लहान लेकरं अंधारात राहिली. हे प्रकरण गावातल्या सरपंचाच्या मध्यस्थीनं मिटवण्यात आलं; परंतु मारहाण झालेल्या तरुणांना न्याय मिळाला नाही.

पुढे वाचा

देख तेरे संसार की हालत…

‘धर्मापेक्षा मोठे कोणी नाही, मग कोणाच्या जिवाला धोका असला किंवा एखाद्याचा जीव गेला तरी चालेल’ अश्या वृत्तीवर प्रहार करणारा ‘भोंगा’ चित्रपट नुकताच पाहण्यात आला. Hypoxic Ischemic Encephalopathy या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याची प्रकृती दिवसभरातून पाच वेळा होणाऱ्या मशिदीतील अजानच्या आवाजाने अधिक खालावते. त्या भोंग्याच्या आवाजाचा परिणाम मुलाच्या मेंदूवर आणि मनावर होत असून, “तुम्ही एकतर घर बदला किंवा त्या भोंग्याचा आवाजतरी कमी करा”, असा सल्ला डॉक्टर देतात. सोबत उपचार सुरूच असतात. घर बदलणे शक्य नसल्याने कुटुंबीय, गावातील सुजाण नागरिक भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी संबंधितांकडे विनवणी करतात.

पुढे वाचा

पत्रोत्तरे

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवर मूळ लेखकांनी पाठवलेली पत्रोत्तरे तसेच इतरांचे अभिप्राय प्रकाशित करीत आहोत.

सकारात्मक बदल घडवून आणण्यात वैचारिक द्वंद्वांची महत्त्वाची भूमिका असते. आपले विचार परत परत तपासून घेऊन त्यास अधिक धारदार करणे वा विरूद्ध विचार पटल्यास त्यांना आत्मसात करणे असे सतत होत राहिले पाहिजे.

सुधारकच्या माध्यमातून असे होत असलेले बघून आनंद वाटतो.

समन्वयक – प्राजक्ता अतुल
09372204641
aajacha.sudharak@gmail.com

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.  

पत्रोत्तर (अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे ह्यांच्या प्रतिसादावर डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचे उत्तर)

स. न.

माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले.

पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच आधुनिक औषधशास्त्राचा भाग बनतात. आयुर्वेदाधारीत रिसरपीन हे औषध, भगेंद्रासाठी सूत्रचिकित्सा किंवा चिनी वनस्पतीचे अरटेमेसुर हे मलेरियासाठीचे औषध अशी काही मूळ ‘देशी’ औषधे आता आधुनिक वैद्यकीचा भाग आहेत. 

पुढे वाचा

स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊया – अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे

(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने)

२४ एप्रिल २०२०च्या महाराष्ट्र टाइम्समधील डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा “या मार्गानेच जाऊया” हा लेख ‘सुधारक’च्या १ मे २०२०च्या कोरोना विशेषांकांत पुन:प्रकाशित झाला. तेव्हा म.टा.ला कळवायची राहून गेलेली प्रतिक्रिया ‘सुधारक’च्या सुजाण वाचकांसाठी सत्वर पाठवत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ पारंपरिक-पूरक वैद्यकांस नीटसपणे पुढे आणून, येणार्‍या काळात प्रत्येक देशाचा आरोग्यांक वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. [https://www.who.int/traditional-complementary-integrative-medicine/strategy/en/] असे असता लेखाच्या सुरुवातीपासून इतक्या कडवटपणे देशी औषधांचा तिरस्कार करण्याचे कारण कळत नाही. 

कोण्या उच्चविद्याविभूषित म्हणविणार्‍याने एका सामाजिक व्यासपिठावरून केलेली मांडणी ही भाषेचाही दर्जा सोडून झाली की तेथेच काही काळेबेरे असावे अशी शंका येते. चीनचे

पुढे वाचा

पत्रसंवाद

‘आजचा सुधारक’च्या जुलै 2016च्या अंकामध्ये डॉ. रवीन्द्रनाथ टोणगावकर यांच्या आध्यात्मिक साधनेमधील वैज्ञानिक सत्य सांगणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध आलेला आहे. या लेखात विपश्यना साधनेविषयी जी विधाने केलेली आहेत ती वस्तुस्थितीनुसार दिसत नाहीत. वास्तविक डॉ. टोणगावकर यांनी स्वतःच इगतपुरी येथील दहा दिवसांचे शिबिर पूर्ण केलेले असल्यामुळे त्यांच्या लेखात अशी विधाने यावीत याचे सखेद आश्चर्य वाटते. मी स्वतः इगतपुरी येथे दहा दिवसांची विपश्यना शिबिरे अनेकदा केलेली आहेत. विपश्यनेचा अभ्यास सुरू करतानाच श्री. गोएंका गुरुजी हे स्पष्ट करत असत की त्या साधनेमध्ये स्वतःच्या नैसर्गिक श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवावयाचे आहे, ‘कोणत्याही प्रकारचा प्राणायाम करावयाचा नाही’.

पुढे वाचा

प्रतिसाद

१ आजचा सुधारकच्या विचारभिन्नता विशेषांक वाचला. अंकातील लेख चांगले असले आणि गूगलवर शोधून इंग्रजीत मिळणाऱ्या माहितीचे मराठीतून केलेले संकलन म्हणून महत्वाचेही असले तरी समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये (शिवाय भविष्याचा वेध घेणारं लेखनही अंकात नाही) त्यामुळे खरं सांगायचं तर किंचित निराशा (नि अपेक्षाभंग) झाला. मी जेव्हा म्हणतो की समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये, तेव्हा मला बरंच काही म्हणायचंय. आधी एक स्पष्ट करतो की यातील बहुतांश लेख ‘महत्त्वाचे’ आहेत.

पुढे वाचा