विषय «महिला»

नास्तिकवाद आणि स्त्रिया

सत्यासत्यता, अज्ञान व अपसमज यांच्या पलीकडे जाणारी नास्तिकता हवी आहे

नवी दिल्ली: फर्नांड डी व्हॅरेन्स, संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्याकांच्या समस्यांवरील विशेष संवाददाते, यांनी भारतातील “बिघडत चाललेल्या” (मानवी) अधिकारांच्या बिघाडाचे “मोठ्या प्रमाणात झालेला, पद्धतशीर आणि धोकादायक बिघाड” असे वर्णन केले आहे.

त्यांनी मणिपूरचा दाखला देऊन म्हटले आहे, “जिचे भयानक अत्याचारांमध्ये रूपांतर होऊ शकेल अशा मुस्लिम आणि इतर धार्मिक ’इतरेजनांना’ व्यापक प्रमाणावर बळीचा बकरा बनवण्याच्या आणि त्यांच्या अमानवीकरणाच्या प्रक्रियेचे हे लक्षण आहे.” “२०१४ आणि २०१८ च्या दरम्यान अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये ७८६% वाढ झाल्याचे दिसून आले” अशा एका अभ्यासाचा त्यांनी हवाला दिला.

पुढे वाचा

ठिणगी

ए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.

पुढे वाचा

महिला नाहीत अबला… पण केव्हा?

Image by Wokandapix from Pixabay
Image by Wokandapix from Pixabay

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

बोधकथा

आमचा वाद चालला होता.

विवेक म्हणाला, “बोधकथा पुस्तकात वाचायच्या असतात. थोर थोर लोक सांगतात आणि आपण भारावून जातो त्या बोधानं. पण त्यांचा बोध परलोकातला असतो. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नसतो.”

“दमछाक कशाला करून घ्यायची पण? आपल्या बापजाद्यांच्या बोधकथांच्याच वाटेवर चालावं ना…. धोपट मार्गा सोडू नको…” किरण म्हणाला.

“बोधकथा ‘धोपट मार्गा सोडू नको’ असं नाही सांगत किरण्या.. त्या कधीही थेट बोलत नाहीत. साधं “रस्ता ओलांड” असं वाक्य असलं बोधकथेत, तरी तो रस्तादेखील बोधकथेतलाच असतो. आपल्याला साधा डेक्कनवरचा रस्ता ओलांडायचा तरी मोठं दिव्य करावं लागतं.

पुढे वाचा

समता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे!!

मध्यंतरी आमच्या भागातील काही महिलांनी हस्तलिखितासाठी काही विषयांची निवड केली. त्यात एक विषय होता ‘आधुनिक स्त्रीचे अति-स्वातंत्र्य’! हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे?, लोकशाही किती खरी किती खोटी?, विकास किती खरा किती खोटा?… असे प्रश्न पडायला लागले आहेत.  

‘आधुनिक स्त्रीचे अतिस्वातंत्र्य’ हा विषय वाचून तर मला माझे (आताही) न लिहिण्याच्या आळसाचे स्वातंत्र्यच या विदुषींनी हिसकावून घेतल्यासारखे वाटले. तर नक्की कुठे आणि कसे स्वतंत्र झालो आपण? आहार, विहार, पेहराव, विचार, समजुती, पूर्वस्मृती, निवारा यांपैकी

पुढे वाचा

अंधार्‍या वस्तीतला उजेड

मुख्य रस्त्यावरची ती वेश्या वस्ती… काही बायका बाजेवर बसल्या होत्या… अगदी रिकाम्या… काहीच काम नसल्यासारख्या…

तशीही ही वस्ती दिवसभर गडद मेकअप उतरलेल्या चेहऱ्यासारखी… झगमग लायटिंगमधील बंद केलेल्या बल्बसारखी…

लॉकडाऊनमध्ये थोडा भकासपणा वाढल्यासारखा…

स्थानिक कार्यकर्ते व आम्ही बाजेवर बसलेल्या बायकांशी बोलायला गेलो. एक बाई थोडे बोलू लागली. पत्रकाराने कॅमेरा काढताच लाईट बंद व्हावा तशी ती गप्प (mute) झाली.

चटकन म्हणाली,

“कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही, वस्तीत हवे तर एकत्र बोलू. पण वस्तीतही पुढे-पुढे बोलणार नाही. उगाच बाकीच्या बायका वैतागतात…”

थोडा अंतर्गत राजकारणाचा विषय होता.

पुढे वाचा

शेतीक्षेत्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी स्वयंसहाय्य गट

भारतात कामकरी महिलांपैकी ८०% महिला शेतीत व संलग्न व्यवसायात आहेत. शेती, पशुपालन, वनीकरण, मासेमारी या व्यवसायात शेतकरी, मजूर, किरकोळ विक्रेते म्हणून त्या काम करतात. या महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय व आरोग्य या दृष्टीने सर्वात जास्त वंचित आहेत. या महिलांचे सबलीकरण करून त्यांचा विकास करणे हे फार मोठे आव्हान आहे.

आर्थिक स्थिती- शेतीमध्ये महिला पेरणी, रोवणी, निंदणी, कापणी, खुडणी, वेचणी यांसारखी अकुशल व कष्टाची कामे करतात. शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मजुरी ही पुरुषांपेक्षा कमी असते व त्यांना नियमित काम मिळत नाही. कोरडवाहू शेतीत केवळ ४०-५० दिवस काम मिळते व ओलीत क्षेत्रात ८० ते १०० दिवस काम मिळते.

पुढे वाचा

नव्या समजुतीची गरज

नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्‍यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्‍यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.

सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्‍या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात.

पुढे वाचा

ती बाई होती म्हणुनी….

इंग्लंडमधल्या विपश्यनाकेंद्रात एका जर्मन साधक-गुरूची गाठ पडली. त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, “कोणताही आध्यात्मिक विषय शाळांमध्ये आणताना आम्हांला खूप परवानग्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुन्हा आम्हांला मूलतत्त्ववादाकडे जायचं नाही…कारण तुम्हांला माहीतच आहे…!” असं म्हणून ते खजील होऊन हसले. मला उगीचच अपराधी वाटलं… त्यांच्या अकारण अपराधी वाटण्याबद्दल…! खरं तर त्यांचा जन्मच हिटलरच्या अंतानंतर झालेला. कुठल्याही प्रकारे ते त्या अत्याचारी कालखंडाचे समर्थक असण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही त्यांचा चेहरा अपराधी झाला. जणु काही ‘हिटलरच्या देशातला म्हणून माझी मान आता कायमच शरमेने खाली राहणार,’ असं त्यांना म्हणायचं होतं.

पुढे वाचा

शिक्षणात लैंगिकताशिक्षणाचा उतारा हवाच हवा

वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकताशिक्षण देणे. दुर्दैवाने ‘फाशी’, ‘नराधम’, ‘हिंसा’ वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.

लैंगिकताशिक्षणाला नाव काहीही द्या. ‘जीवन शिक्षण’ म्हणा, ‘किशोरावस्था शिक्षण’ म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात पुढच्या पिढीपर्यंत, या बाबतीतली अत्यंत विपर्यस्त, चुकीची आणि चुकीच्या स्रोतांद्वारे पसरवली जाणारी माहिती सदासर्वदा पोहोचत असते. ती थोपवणे आता सरकार, पालक, शिक्षक, शाळा कोणालाच शक्य नाही. तेव्हा योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य ती माहिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे, एवढेच आपण करू शकतो.

पुढे वाचा