भ्रष्टाचार आणि माहितीचा अधिकार

गरिबी व भ्रष्टाचाराचा घनिष्ठ संबंध आहे. भ्रष्टाचाराचा विपरीत परिणाम सर्वच समाजावर होतो पण सर्वांत जास्त फटका गरीब व वंचित घटकांना बसतो. त्यांचे मूलभूत हक्कच डावलले जातात. कारण सामान्य लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, रेशन, जमीन मालकीची कागदपत्रे मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते. भारतातील बहुसंख्य लोकांना हे सहन करावे लागते. भारतातील जनमानसात भ्रष्टाचार खोलवर रुजलेला आहे.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या Corruption Perception Index २००६ प्रमाणे भारत १६३ देशांमध्ये भ्रष्टाचारात ७० व्या क्रमांकावर होता तो आता ८८ व्या क्रमांकावर आलेला आहे. भारतातला भ्रष्टाचार कमी होण्यात माहिती अधिकार कायद्याचे योगदान आहे. [Transparencyinternational.org च्या संकेतस्थळावरून ]