विषय «इतर»

वामन मल्हारांची सत्यमीमांसा

वा.म. जोशी हे मानवी जीवनाचे एक थोर भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटीस’ म्हणण्याचा प्रघात आहे. सॉक्रेटीसप्रमाणेच जीवनाचा अर्थ, त्याचे प्रयोजन आणि साफल्य शोधणे या गोष्टींभोवती त्यांचे तत्त्वचिंतन घोटाळत राहाते. सॉक्रेटिसाच्या संवादांचे भाषांतर ही त्यांची पहिली वाङ्यकृती असावी ही गोष्ट पुरेशी सूचक आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी ‘सत्य, सौजन्य आणि सौंदर्य’ या त्रयीचा निरंतर पुरस्कार केलेला आहे. या तत्त्वत्रयीतील ‘सत्य’ ह्या संकल्पनेचा वामनरावांनी केलेला विचार प्रस्तुत निबंधाचा चर्चाविषय आहे.
वा.मं. च्या नीतिशास्त्र-प्रवेश या बृहद्रंथात दहा परिशिष्टे जोडली आहेत. त्यांतील ‘सत्य हे साधन की साध्य?’

पुढे वाचा

मला उमगलेले डॉ. आंबेडकर

आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करीत असताना मी एक टिपण टिपले. ते असे —-
अस्पृश्यतेचे चटके बसलेले आंबेडकर जर साहित्यिक बनले असते, तर विद्रोद्दा व संघर्षाची भाषा स्वीकारून, त्यांनी ‘दलित साहित्य’ निर्माण केले असते. पण असे ‘साहित्यिक’ ते झाले नाहीत. ते ‘समाजसुधारक’ झाले. मृाची भावना जोपासण्याऐवजी त्यांनी क्रांतिकारकता जापासली. ते ‘समतेचे’ पुरस्कर्ते बनले. सामाजिक व आर्थिक ममतेप्टे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अंमळ गौण मानला. देशभक्ती गौण मानली, असे मात्र नाही.
मनुस्मृति जाळणे हिंदत्व – विरोधी दिसले तरी कालबाह्य झालेल्या दोघांना बाजूला सारण्याचा तो एक संकेत होता.

पुढे वाचा