मासिक संग्रह: डिसेंबर, २००२

पत्रसंवाद

चिं. मो. पंडित, ६ सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई — ४०० ०५७
नुकतीच एका तरुण कार्यकर्त्याने अशी खंत व्यक्त केली की सामाजिक कार्य करताना त्याला सततच त्याची विश्वासार्हता सिद्ध करावी लागते. म्हणजे असे की समजा ‘नामांतराचा’ प्र न असेल किंवा ‘आरक्षणाचा’ प्र न असेल तर तो मांडत असलेल्या विचारावर त्याच्या ‘ब्राह्मण्याचा’ अजिबात प्रभाव नसून त्याचे विचार तर्काधिष्ठित सम न्यायतत्त्वावर मांडलेले आहेत हे त्याला आधी सिद्ध करावे लागते. वर्षांनुवर्षे ज्यांच्या बरोबर तो काम करतो त्यांचीही अशी धारणा पाहून मन फार उद्विग्न होते.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

कुंपणापलिकडचा देश – प्रमोद सहस्रबुद्धे
भौगोलिक प्रदेशमानाप्रमाणे संस्कृती बदलत राहते.पण हा बदल बहुधा हळू हळू घडत जातो. शेजारच्या किंवा जवळच्या भूभागातील संस्कृतीत साम्यस्थळेच अधिक असतात. विविध कारणांसाठी बऱ्याच जणांना हे सत्य पटत नाही, किंवा ते अशी परिस्थिती बदलवू इच्छितात. बहुतांशी ही कारणे धार्मिक वा राजकीय असतात. असे लोक मग ठिकठिकाणी आपल्या कुवतीनुसार सांस्कृतिक बेटे तयार करू लागतात. अर्थात अशा गोष्टी अनैसर्गिकच असतात, आणि त्यामुळेच की काय, संस्कृतीचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांना भयाचे किंवा लाचलुचपतीचे कुंपण घालावे लागते. दोन देशांतील संस्कृती-साठी मात्र हेच कुंपण ‘प्रत्यक्ष’ असू शकते.

पुढे वाचा

अशरीरी आत्मा (?)

दहा वर्षांपूर्वी आम्ही सूझन ब्लॉकमोअरला तिच्या ससेक्स परगण्यातल्या ‘पेअरट्री कॉटेज’मध्ये भेटलो. त्यावेळी शरीरबाह्य अनुभव (out of body experiences उर्फ OBE) या क्षेत्रात संशोधन करणारी ती बहुधा जगातली एकुलती एक परामानस शास्त्रज्ञ (Parapsychologist) होती.
शरीरबाह्य अनुभव म्हणजे आपण आपल्या शरीरबाहेरून शरीराकडे पाहत असल्याचा अनुभव. यासारखाच एक प्रकार म्हणजे मृत्यूच्या निकटचे (near death) अनुभव, किंवा NDE. वैद्यकीयदृष्ट्या मृत शरीराबाहेर आपण एका अंधाऱ्या बोगद्यातून जात आहोत, आणि मृत शरीराचे ‘पुनरुज्जीवन’ होताच आपण परत शरीरात ओढले जात आहोत, अशा धर्तीचे हे NDE अनुभव असतात. OBE आणि NDE अनुभवांच्या अनेक वर्णनांमधून अशरीरी आत्मा (Spiritual self) आणि तारकांच्या पातळीवरील शरीर (astral body) या कल्पना घडल्या.

पुढे वाचा

“माणसाला जमीन किती लागते व त्याहून जास्त वापरली तर चंगळ!”

काही वर्षांपूर्वी काझीरंगा अभयारण्याला गेलो असता, एक गंमतीची गोष्ट पाहिली. गेंड्याच्या लीदीचे चारपाच ढिगारे पाहिले. त्यांनी मर्यादित केलेली जमीन दोन-अडीच हेक्टर होती. कर्मचाऱ्यांशी चौकशी करता असे कळले की हे काम कर्मचाऱ्यांनी केले नसून गेंड्यानेच तसे ढीग घातले आहेत. आपल्या जागेचे स्वामित्व दाखवण्यासाठी गेंड्याची ती युक्ती होती. हत्तीप्रमाणे गेंडा कळपात रहात नसल्यामुळे एका गेंड्याला जगण्यासाठी किती जमीन लागते हे सिद्ध झाले. आ.सु.मधील संपादकीयात (१२.१२) सुरुवातीच्या परिच्छेदात उत्क्रांतीचा आधार घेऊन जमिनीचे परिमाण ठरवले आहे, त्या पद्धतीत व गेंड्याच्या रांगड्या पद्धतीत थोडेफार साम्य आहे.

पुढे वाचा

गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना

लोकसत्तेच्या दि. १५-९-२००२ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. अभय दि. कानेटकरांचा “गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना” हा लेख मुखपृष्ठावर व अंतिम पृष्ठावर ठळकपणे छापण्यात आला आहे. सश्रद्ध, भाविक तथा देवभोळ्या भक्तसमुदा-यांसाठी या लेखाचे प्रयोजन असावे. अन्यथा विवेक जागृत असलेल्या व विज्ञानाची तोंडओळख असलेल्या कोणत्याही इसमास डॉ. कानेटकरांची विधाने (त्यांच्या समुदायास मान्य असलेल्या सांस्कृतिक परंपरेला आदर्श मानणाऱ्या इसमांना सोडून) स्वप्नात असंबद्ध बडबड करणाऱ्या भ्रमिष्ट माणसांची कपोलकल्पित विधाने असावीत असा भ्रम झाल्या शिवाय राहणार नाही. त्यांची विधाने अशी . . .
१. गणेशजन्म हे अध्यात्म व विज्ञान अशा दोन्ही शास्त्रांना आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ७

बाजारपेठेला कायदा ‘साक्षी’

संस्कृतिसंघर्ष:
जातीपातींच्या श्रेणींच्या अन्याय्य चळतीने जखडलेला, पण तरीही सुसंगत स्थैर्य पावलेला, असा भारतीय समाज कसा घडला ते आपण पाहिले. सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी कसे वागावे याबद्दलच्या वहिवाटी आणि जाती आणि जातसमूहांची वीण, अश्या साऱ्या यंत्रणेतून समाजाचे ‘शासन’ होत असे. त्या मानाने राजे कमी महत्त्वाचे इंग्रज मात्र आले तेच औद्योगिक क्रांतीने आमूलाग्र बदललेली जीवनशैली सोबत घेऊन. त्यांच्या मायदेशातही जीवनशैलीतील बदल नुकतेच अंगवळणी पडू लागले होते. याला तीन मुख्य अंगे होती.
एक म्हणजे वस्तुव्यवहार वाढले होते. मूळच्या नैसर्गिक वस्तूंपासून अनेक नवनव्या वस्तू घडवता येऊ लागल्या होत्या.

पुढे वाचा

साधु-असाधु आणि विहित-निषिद्ध

गेल्या महिन्याच्या (नोव्हेंबर २००२) आ.सु.मधील ‘नीतीची भाषा’ या लेखात म्हटल्याप्रमाणे नैतिक वाक्ये जर सत्य/असत्य असू शकत नसतील, तर उद्भवणाऱ्या ‘मग नैतिक वाक्यांत युक्त अयुक्त किंवा स्वीकरणीय/त्याज्य असे काही असत नाही काय?’ या प्र नाला काय उत्तर आहे हे सांगणे बऱ्याच विस्ताराचे असल्यामुळे ते पुढील अंकापर्यंत रोखले होते. ते आता सांगितले पाहिजे.
नैतिक वाक्ये सत्य/असत्य असू शकत नाहीत हे मत बरेच अलीकडचे आहे. त्यापूर्वी सामान्यपणे असे मानले जाई की ‘अमुक गोष्ट चांगली/वाईट आहे’, किंवा ‘सत्य बोलावे’, ‘स्वार्थी आचरण टाकून द्यावे’ ही वाक्ये सत्य किंवा असत्य आहेत, किंवा ती विषयिनिरपेक्ष आहेत.

पुढे वाचा

वस्तुवादी इतिहास-मीमांसा

वस्तुवादी इतिहास-मीमांसा
कार्ल मार्क्सने सामाजिक इतिहासाकडे पाहण्याचा जो एक विशिष्ट दृष्टिकोण बसविला आहे, त्याला ‘वस्तुवादी इतिहास-मीमांसा’ या नावाने संबोधणेच योग्य होईल. पण या ठिकाणी ‘वस्तू’ हा शब्द केवळ जडसृष्टी-पुरताच मर्यादित नाही. भौतिक परिस्थितीशी सुसंगत असल्यामुळे जन-मनाची पकड घेणाऱ्या विचारप्रवाहांचाही त्यात अंतर्भाव होतो. हा दृष्टि-कोण म्हणजे कुठल्याही देशातील कोणत्याही ऐतिहासिक घटनांचा हुकमी अन्वयार्थ लावण्याचा सांप्रदायिक गुरुमंत्र नव्हे. इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अध्ययनाची ती सर्वसामान्य दिशा आहे. समाजजीवन हा निरनिराळ्या शक्तींच्या व प्रेरणांच्या संघर्षातून सिद्ध होणारा जिवंत प्रवाह आहे. त्याला एखाद्या ठरावीक साच्यात चपखल बसविता येईल ही कल्पनाच मुळी भ्रामक आहे.

पुढे वाचा