प्रस्तावना

नमस्कार,
‘आजचा सुधारक’ च्या संकेत स्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत.
‘आजचा सुधारक’ हे पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करणारे मासिक असून एप्रिल 1989 पासून नियमितपणे छापिल स्वरूपात प्रसिद्ध होत आहे. या मासिकाचे पीडीएफ स्वरूपात जुने अंक आणि यानंतरचे नवीन लेख ई स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे या संस्थळाचे उद्दिष्ट आहे.
हे संस्थळ लेखक व वाचकांच्यासाठी पुरोगामी विवेकवादी विचारांना उत्तेजन देणाऱ्या व्यासपीठाच्या स्वरूपात असेल. या विचारांचे लेख, चर्चा, प्रतिसाद यांचा समावेश यात असून त्यांचे येथे स्वागत होईल.

या संस्थळावरील प्रासंगिक मध्ये स्फुट लेखन, चर्चेचा विषय, नवीन पुस्तक,  वा वार्ताविशेष यांचा समावेश असेल.
या संस्थळावरील मनोगत मध्ये ‘आजचा सुधारक’ मासिकाचे संस्थापक व प्रथम संपादक डॉ. दि. य. देशपांडे यांनी पहिल्या अंकासाठी लिहिलेले संपादकीय असून या मासिकाचे (व तदनुषंगाने या संस्थळाचे) उद्दिष्ट त्यात स्पष्ट केलेले आहे.
संस्थापक सदरात डॉ. दि. य. देशपांडे यांचा अल्प परिचय दिलेला आहे.
छापिल मासिकाप्रमाणे दर महिन्याला नवीन लेख लेखसूची या सदराखाली येत राहतील. लेखावरील प्रतिसादांचे स्वागत होईल. कृपया संपर्कात उल्लेख केलेल्या ई- पत्त्यावर आपल्या सूचना, प्रतिसाद पाठवावे व संस्थळाच्या उद्दिष्टाशी पूरक असे लेख पाठवावीत, ही विनंती.
अभ्यासकांसाठी लेखकसूचीविषयसूचीची वेगवेगळी पानं असून त्यावरूनसुद्धा मूळ लेख वाचता येतील.
विशेषांक या सूचीमध्ये आतापर्यंत वेळोवेळी छापलेल्या आजचा सुधारकच्या विशेषांकांची यादी असून ते अंक ज्याना हवे असतील त्यांना पीडीएफ स्वरूपात पाठविले जातील. यासाठी संपर्कात उल्लेख केलेल्या ई- पत्त्यावर संपर्क साधावे.
शिफारस या  सदरात पुरोगामी व विवेकवादी विचारासंबधीचे काही निवडक पुस्तकांची यादी दिलेली आहे. या यादीत आपणही भर घालू शकता.
मागील अंक या सदराखाली पीडीएफ स्वरूपात अंक असतील आपण ते download करु शकता .

शेवटी आपल्यासारख्या चोखंदळ वाचक – लेखकांसाठी हे संकेत स्थळ असून आपल्या सहकार्याविना ही पुरोगामी चळवळ पुढे नेता येणार नाही, हे आम्ही नमूद करू इच्छितो.