शाश्वत विकासाकरिता आवश्यक मूलभूत परिवर्तनांचा शोध
हा विशेषांक आजचा सुधारक, नागपूर आणि इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे ह्यांचा एकत्रित प्रयत्न आहे.
सद्यःपरिस्थितीत मानव आणि निसर्गातील मानवेतर घटक ह्यांच्यातील सहजीवन अनेक ज्ञात-अज्ञात कारणांमुळे बिघडत चालले आहे. मनुष्याची हाव हे ह्यामागील मुख्य ज्ञात कारण धरले तर आपण स्वतःचाच विनाश ओढवून आणतो आहोत, ह्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. शाश्वत विकासाची नवीन व्याख्या आणि धोरणे तयार करून लगेच राबविली नाहीत तर, मनुष्यजातीची प्रगतीच नव्हे तर अस्तित्वदेखील धोक्यात येवू शकेल, अशी अनेक चिन्हे आता दिसू लागली आहेत.
ह्या बहुआयामी विषयावर अनेक व्यक्ती आणि संस्था वेगवेगळ्या पद्धतींने, मुळापासून गंभीरपणे विचार करीत आहेत.