(प्रथम-प्रकाशन सप्टेंबर १९९१ वर्ष २ अंक ६-७, लेखक: दि.य.देशपांडे) - लेख सूची

विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का? आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका अक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : ‘तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा …