अदिती संहिता जोशी - लेख सूची

जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रश्न सोडवू शकत नाही

बुद्धिमत्ता म्हणजे काय? अवजारे वापरणे हे बुद्धिमत्ता असण्याचे एक लक्षण मानले जाते. आपण माणसेही ज्या वानरगणाचा भाग आहोत, त्यातले चिंपांझी काडी वापरून मुंग्या पकडून खातात. माझ्या एका मित्राकडे कुत्रा आहे. काही वर्षांपूर्वी तो मला सांगत होता की त्याच्या कुत्र्याची प्रजाती कुत्र्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची आहे, हुशारीच्या बाबतीत. मी त्याला म्हणाले, “माझ्याकडे मांजर आहे. तिला कॅल्क्युलस येत …