ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी
आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे …