अनुराधा मोहनी - लेख सूची

‘हाजी अली सर्वांसाठी’: एक अनावृत्त पत्र

स्त्रीहक्क, हाजी अली, सुफी पंथ दि. १३ मे २०१६प्रति,विश्वस्त,हाजी अली दर्गा विश्वस्त मंडळ,वरळी, मुंबई हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांनी ह्या प्रश्नांना उत्तरे दिलीच पाहिजेत. महोदय,सर्वांना आमचा सलाम व शुभेच्छा.‘हाजी अली सब के लिये’ ह्या आमच्या गटाच्या प्रतिनिधींनी विश्वस्तमंडळ सदस्यांना भेटून हाजी अली साहेबांच्या दर्ग्यात प्रवेश करून त्यांना मजार पर्यंत जाण्याचा स्त्रियांनाही पुरुषांइतकाच हक्क असला पाहिजे ह्या …

प्रतिसाद

तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट —————————————————————————– फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक …

अनश्व रथ, पुष्पक विमान या लेखमालिकेवरील चर्चासत्र

(रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ यांच्या आजचा सुधारक च्या सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2015 च्या अंकात अनश्व रथ, पुष्पक विमान ही लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्या लेखमालिकेवरील चर्चासत्राचा हा वृत्तांत आहे. हे चर्चासत्र मुंबई सर्वोदय मंडळ, शांताश्रम, ताडदेव, मुंबई येथे दि. ७.१२.१४ रोजी आयोजित केली होती. व डॅनियल माजगावकर, सुनीती सु. र. व सुरेश सावंत या चर्चासत्राचे …

वैकल्पिक माध्यमांसमोरील आह्वाने

(‘साम्ययोग साधना’ ह्या वैचारिक साप्ताहिकाचा हीरक महोत्सव जानेवारी २०१५ मध्ये धुळे येथे संपन्न झाला. येथे परिवर्तनवादी चळवळींतील नियतकालिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच विषयांवर चांगले विचारमंथन व उद्बोधक चर्चा घडून आली. श्रोत्यांनीही चांगला सहभाग घेतला. अशा प्रकारे ह्या विषयावरील चर्चा महाराष्ट्रात तरी बèयाच वर्षानंतर झाली असावी. त्यातील …

विधवाविवाह चळवळ

ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, “तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस, परंतु या ९ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का?’ ईश्वरचंद्रानी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची कणव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवाविवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवणाच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला. ही हकीगत एकोणिसाव्या शतकाच्या …

पुस्तक परिचय

गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून …

पुस्तकपरिचय

स्त्री. उवाच वार्षिक, १९९२. ३०३ नवीन आशा, दादासाहेब फाळके मार्ग, दादर मुंबई – ४०० ०१४सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या …