‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’: एका दृष्टिकोनातून
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट या पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीची गोष्ट हसतखेळत सांगतो. त्यात फाळक्यांचे झपाटलेपण, आपल्या ध्यासाकरता त्यांनी सोसलेले हाल, निर्मितीत त्यांना आलेल्या अडचणी आणि तरीही या सर्व प्रक्रियेत निर्मिकाला मिळणारा आनंद यांचे प्रभावी चित्रण आहे. याशिवाय एक धागा मोकाशी यांनी आपल्या चित्रपटात सातत्याने मांडला …