देव-धर्मवेड्या समाजाचं व्यंगचित्र
‘देवनगरीत शेजाऱ्यावर प्रेम करणारे कमी आहेत, त्यामानानं शेजाऱ्यांच्या मांजरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांजरवेडय़ांना इथे शहाणं समजलं जातं, मात्र अशा या प्रात:स्मरणीय मांजरांना देवनगरीत हमरस्त्यावर यायला बंदी आहे. कारण मांजरं माणसांना आडवं जाऊन त्यांचा खोळंबा करतात, ही सामूहिक श्रद्धा. देवनगरीत एकदा एक माणूस साप चावून मेला. त्याला जिवंत करण्यासाठी इथला सुप्रसिद्ध मांत्रिक लगबगीनं निघाला, …