आनंद तेलतुंबडे - लेख सूची

स्वयंसेवी संस्थांचे कार्य: चिकित्सक दृष्टीची गरज

कोणत्याही गोष्टीच्या सर्वसाधारण आकलनासाठी तिच्याकडे इतिहासाच्या चौकटीतून पाहणे फायद्याचे ठरते. त्याप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचा उदय, त्यांचे चरित्र, त्यांत आलेले बदल इत्यादि गोष्टींच्या सारासार आकलनासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था संकल्पनेच्या पातळीवर खूप प्रचलित असू शकतात. पण त्यांचा वर्तमान स्वरूपातील उदय हा १९ व्या शतकात झालेला दिसतो. त्या काळात त्या गुलामगिरीविरुद्ध आणि स्त्रियांच्या मतदान-हक्कासाठी …