आशा व्रह्म - लेख सूची

अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया

विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा …