इतर - लेख सूची

टिप्पणीविना वृन्दावनच्या विधवांचा रंगोत्सव

मथुरेच्या जवळचे वृन्दावन म्हणजे विधवांचे क्षेत्र. हतभागिनी, फुटक्या कपाळाच्या मानल्या गेलेल्या ह्या विधवा येथे समाजापासून तोंड लपवून कृष्णाची पूजाअर्चा करीत कसेबसे आयुष्य कंठतात. ह्या वर्षी त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडली. त्या चक्क होळी खेळल्या. सण-उत्सवात त्यांना सहभागी होऊ न देणाऱ्या प्रथा-परंपरा धाब्यावर बसवून त्यांनी जल्लोष साजरा केला. त्या गाणी गायल्या, नाचल्या. एकमेकींच्या अंगावर त्यांनी …

आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?

आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील? अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपातील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन काळी येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाही ! …. पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असे विचारतो की, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारे गतवैभवाचे गाणे गाऊ लागला म्हणजे तुमच्या …