कुमार काटे - लेख सूची

राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल (भाग-२)

सप्टेंबरच्या अंकापासून सुरू झालेला हा अहवाल तीन भागांत तीन वैशिष्ट्यांवर भर देणारा आहे. ‘वाकडी वाट’, ‘बाबूजी’ व ‘बीबीजी’ हे त्यांतले ३ कोन आहेत. मागील लेखांकांत ‘बाबूजी’ व ‘इंडिया टुडे’ने शीर्षस्थ मानलेले दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती अर्थात् ‘डॉ. स. राधाकृष्ण यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले. आता या दुसऱ्या भागात ‘वेडी’, ‘वाकडी’, ‘तिरकी’ वाटचाल कशी याचा ऊहापोह करू. त्याचबरोबर १२ …

राष्ट्रपतिपदाची वेडीवाकडी वाटचालः बाबूजी ते बीबीजी!

आजचा सुधारकात माझे मित्र डॉ. किशोर महाबळ यांनी ‘१३ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर मार्मिक लेख लिहिला. त्यानंतर इंडिया टुडे या (मूळ पाक्षिकातून आता साप्ताहिक झालेल्या) प्रकाशनाने निवृत्तिपूर्वी दोनच दिवस आधी दिलेल्या खास मुलाखतीच्या आधारे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर एक विशेष लेख लिहिला. त्याही पूर्वी महिलावर्ग आणि महाराष्ट्र प्रदेश यांचा एकसमयावच्छेदेकरून उद्धार करण्याच्या उदात्त उद्देशाने जेव्हा सौभाग्यवती …