मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत …