गीता साने - लेख सूची

जुन्या चाकोरीत फसलेली मनोवृत्ती

ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण …

भारतीय स्त्रीजीवन

अर्थार्जन करणाच्या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असत नाहीत. बहुतेक कुटुंबांमधून बायकोचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला बायकोने आपला पगार नवर्याोच्या हातात ठेवावा, असा दंडकही या घरांत आढळतो. त्या पगारातून हातखर्चाचे पैसे आधी ठेवून घेण्याची सवड कधी बायकोला असते, तर कधी तिचा पगार हातात आल्यावर त्यातून नवरा तिला हातखर्चाचे पैसे देतो; कधी तिच्या …

पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता

स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला …

स्त्री असुरक्षित आहे

हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या …

सुधारणा झाल्या?

प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ …