गोपाळ गणेश आगरकर - लेख सूची

ज्ञान

पृथ्वीवर ज्ञानाशिवाय अशी दुसरी कोणतीही वस्तु नाही, की जिचा कंटाळा न येतां, किंवा जिच्यापासून शरीरास किंवा मनास कोणतीही व्याधि न जडतां, जिच्या योगानें वृत्ति आमरण आनंदमय राहू शकेल. जे पुरुष ज्ञानसंपादनांत निमग्न झालेले असतात, त्यांसच या अमोलिक सुखाचा निरंतर लाभ होतो. विश्वाच्या विशाल स्वरूपाच्या विचारांत जो गढून गेला व ज्याला ही पृथ्वी एखाद्या क्षुल्लक वारुळाप्रमाणे …

सुधारक काढण्याचा हेतु

पर्वत, नद्या, सरोवरें, झाडे, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुले व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारे, शेतकरी व शेतकीची अवजारे, बाजार व त्यांतील कोट्यवधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरे व उत्तम देवालये, बागा …

आम्ही कां लिहितों?

ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाहीं हे खरे आहे. पण आमचे असले निबंध तसल्या लोकांकरितां लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धींत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व …

लोक काय म्हणतील?

वास्तविक पाहिले तर ज्यांना आपण लोक म्हणतो, व ज्यांच्या अपवादाला आपण भीत असतो, त्यांवर आपले फारच थोडे अवलंबून असते. लोकांना संतुष्ट राखण्याकरिता स्ववंचन करणे हे महापातक आहे असे समजले पाहिजे. सामान्य लोक अंधासारखे गतानुगतिक असतात. विचारी पुरुष अशांच्या छंदाने नेहमी वागतील तर सत्पक्षाचा प्रसार कधीच व्हावयाचा नाही. तेव्हा अज्ञानमग्न, अविचारी आणि ज्यांच्याशी आपला अर्थाअर्थी संबंध …

स्वच्छतेसाठी घाणेरडा विषय

रोग्याचे कल्याण चिंतणार्याा खर्यार बैद्याने जसे पाहिजे तसले घाण काम करण्यास तयार असले पाहिजे तसे समाजहितचिंतक सुधारकाने पाहिजे त्या प्रकारचा विषय हाती घेण्यास सिद्ध असले पाहिजे. अमुक वस्तूचे किंवा अमुक अवयवाचे चारचौघात नाव घेणे किंवा त्याला स्पर्श करणे हा असभ्यतेचा किंवा अमंगलपणाचा प्रकार होय असे पाहिजे तर सामान्य लोकांनी मानावे. भिषग्वर्यांना तो निर्बध लागू करता …

आमचा धर्म

आमचा धर्म इतरांहून श्रेष्ठ आमचा धर्म इतरांच्या धर्माहून श्रेष्ठ आहे, व त्यांचे रहस्य स्पष्टपणे कोणास कधींही कळावयाचे नाही असे म्हणणे म्हणजे कित्येक अशक्य गोष्टी कबूल करण्यासारखे आहे. सर्व दृश्य विश्वाचे आदिकारण; काल आणि स्थल यांनी मर्यादित होत नाही म्हणून ज्याला अनादि आणि अनंत असे म्हणतात; आपली प्रचंड सूर्यमालासुद्धा ज्याच्या अचिंत्य सामर्थ्याचे अत्यंत सूक्ष्म निदर्शन आहे …

रूढ आचारविचारांचा चिकटपणा

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही ही गोष्ट कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पक्की सव्वादोनशे वर्षे होऊन गेली, तरी आमच्या मते सूर्य व चंद्र एका दर्जाचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती घिरट्या घालीत आहेत, आमच्या पंचांगांत प्रत्येक पानावर चमकणारे, पण अर्वाचीन ज्योतिषज्ञास मोठमोठ्या दूरदर्शक यंत्रांच्या साह्यानेही अद्याप न गवसलेले राहू व केतू …

आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम

… सामाजिक सुधारणांपेक्षांहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, आणि म्हणून राजकीय सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करूं पाहाते, हे आश्चर्य नव्हे काय!. ….. जातिभेद, बालविवाह, असंमत वैधव्य, केशवपन वगैरे दुष्ट चालींपासूनआम्हांस पुष्कळ त्रास होत आहे; पणमिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी आमच्या जमिनीच्या बोकांडीस बसणारा रेव्हेन्यू …

विचारकलह आणि प्रगती

बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता?दुष्ट आचाखचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धी करणार्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आज पर्यंत या देशात हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे व बहुधा आमचे लोक गतानुगतिकच असल्यामुळे, हे भरतखंड इतकी .शतके अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे. हा कलह दुष्ट विकोपास …

स्त्रियांचे शिक्षण कसे असावें?

सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. …