चंद्रकांत ठाकरे - लेख सूची

तुकडपट्टी

मला भीती वाटते….माझे डोळे पुसणार्‍यांचीतसाच अंग चोरून उभा असतो!अंग शहारतं….डोळे पुसणार्‍याच्या डोळ्यातील फायदा उचलणार्‍या क्रूर कपटी हालचालींमुळे! माहिती असतं..या अश्रूंची किंमत आता भलताच कुणीतरी उचलेलआणि विरून जातील या वेदनातुकडपट्टी झालेल्या शेताच्या मातीत! अजून एक तुकडा..आणि शेवटचा श्वासएवढंच शिल्लक आहे शेतीचंआणि शेतातच माती होणार्‍या जीवाचं अस्तित्व! उरणार आहेत फक्त फुशारक्या-पूर्वजांकडे असलेल्या शेकडो एकर शेताच्याआणि वांझोट्या रुबाबाच्या …