चिं. मो. पंडित - लेख सूची

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न. कोठच्याही उत्पादक उपक्रमाची …

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न. कोठच्याही उत्पादक उपक्रमाची …

अमेरिकन शेती आणि भारत

तसे पाहिले तर अमेरिका (यूएसए) हा कोणाचेही कुतूहल चाळवणाराच देश आहे. अवघ्या ४५०-५०० वर्षांत शून्यातून उभे राहून हा देश आज सर्व जगात बलाढ्य देश झाला आहे. साहजिकच प्रत्येक गोष्ट अमेरिकेत कशी होते हे जाणून घेण्याकडे आपला कल असतो. पण तत्पूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. अमेरिकेचे क्षेत्रफळ ९३.८ लक्ष चौ. किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ …

पाणी प्रश्नाचे स्वरूप, गुंतागुंत आणि तिढे

(१) मनुष्य स्वभाव मोठा मजेशीर आहे. जे फुकट मिळते त्याचा तो बेजबाबदार वापर करत राहतो मग गरज असो की नसो. निसर्ग साधनसंपत्ती तर सार्वजनिक, कोणाच्याच मालकीची नाही. त्यामुळे तिचा तर वापर कसाही, केव्हाही, कुठेही करण्याचा जणू जन्मसिद्ध हक्कच. आजपर्यंत हवा, पाणी, जमीन, जंगले यांचा असाच वापर आपण करत आलो. हे करता करता अमर्याद वाटणारे पाणी …

समाजहितैषी संस्था बदललेले संदर्भ व कामाचा ढाचा

“महाराष्ट्र हे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ आहे.” असे गांधीजी म्हणत. पाचसहा दशकांपूर्वीच्या त्या स्वयंसेवी संस्था आता बढेशी कालबाह्य झाल्या आहेत किंवा अस्ताला गेल्या आहेत. स्वयंप्रेरित, समाजहितैषी कार्याचे संदर्भच पार बदलले. आपण आज एका युगाच्या अस्ताशी आणि नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. औद्योगिक समाजाचा अस्त होत आहे, आणि राष्ट्रसंकल्पनेची व्यावहारिक पातळीवर पीछेहाट होत आहे. नवीन शैक्षणिक संपर्कसाधनांद्वारे …

शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था

कृषिप्रधान संस्कृतीतूनच कामाची वाटणी (division of labour) सुरू झाली. हळूहळू वस्तुविनिमयही वाढला आणि नागरी समूह उदयाला आला. कारखानदारी आल्यावर तर नागरीकरणाने जोरच धरला आणि नागरी मानवीसमूह, ग्रामीण मानवीसमूह हे स्पष्टपणे विलग झाले. वस्तुविनिमय पैशाच्या माध्यमातूनच सुरू झाला. माणसांचे आमनेसामने संबंध व्यवहार बंद झाले. जे अनेक व्यवहार अपरोक्ष होत ते आता परोक्ष व्हायला लागले. दृश्य, सहज …

माहितीचा स्फोट, संपर्क साधनांचे जंजाळ आणि मानवी वस्त्या, समूह

१) माणसांना एकमेकांना धरून समूहाने राहायला आवडते. यात सुरक्षितता तर असतेच पण परस्परावलंबन, मानसिक धीर सापडतो. एकलेपण टाळले जाते. अगदी रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या वाड्यावस्त्या-पाडे ते आजच्या उत्तुंग इमारती असलेल्या महानगरातील माणसांचे असेच असते. शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिरावला. अतिरिक्त उत्पादनाला सुरुवात झाली. स्वास्थ्य आले आणि माणूस कायम वस्ती करून राहू लागला. ग्रामीण संस्कृती जन्माला …

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग-१)

पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात . . . सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते, आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते, म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे …

कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ

आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या …

शिक्षण? कोण कोणाला हा प्रश्न विचारतोय?

१. नुकत्याच आमच्या घरकामाच्या बाई काम सोडून गेल्या. त्या नववी पास झालेल्या होत्या. त्यांच्या जागी ज्या बाई आल्या त्या अक्षरशत्रू. त्यामुळे बरीच गैरसोय झाली आहे. पूर्वी बाई कामावर आल्या तरी मी घरी असणे आवश्यक नसे. कागदावर सूचना लिहून ठेवल्या की भागत असे. माझ्याकडे कार्यालयात साफसफाई, झाडलोट करण्यासाठी एक शिपाई होता. पाच वर्षांनीपण कामाचे स्वरूप तेच …