ज्ञानेश वाकुडकर - लेख सूची

स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल? ‘भगतसिंग’वाल्या गोळीतरेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात की.. वंचितांच्या स्वरात? कष्टकऱ्यांच्या घामात‘शबरी’वाल्या ‘रामा’तफांदीवर लटकणाऱ्या प्रेतातकी.. डुकरं घुसलेल्या शेतात? ‘बापू’च्या प्रसिद्ध चरख्यातआपल्यासोबत परक्यातविद्यार्थ्यांच्या नव्या चळवळीतकी.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळीत? कुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प की.. ‘क्वारंटाईन’वाला स्टॅम्प ?भेदरलेल्या ‘मुंग्यां’च्या बिळातकी.. ‘सापां’च्या खानदानी पिळात? सांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घरकिंवा त्याचा आनंदानं गुणगुणणारा …