डॉ. तारक काटे - लेख सूची

नव्या कृषी विधेयकांचा भूलभुलैया

आपला देश कोविद १९ महामारीच्या तीव्र लाटेत वेढला असतांनाच्या काळात केंद्र सरकारने तीन नवी कृषी विधेयके संसदेत घाईघाईने मंजूर करून घेतलीत. त्यामुळे या विधेयकांविरुद्ध देशातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलनाद्वारे आपला विरोध नोंदविला. या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा अंतिमत: फायदाच होणार आहे हे जे केंद्रसरकारतर्फे सतत सांगितले जात आहे ते निश्चितच संशयास्पद आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या …

जनुकांतरित (जीएमओ) पिकांच्या विरोधात युरोपातील जनमत

बियाणे, जनुकबदल, बीटी, यूरोप, मोन्टॅन्सो ——————————————————————————– जनुकीय संस्कारित पिके म्हणजे तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल. त्याला विरोध म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान –विकास ह्या सर्वाना विरोध, असे अनेक माध्यमांतून वारंवार सांगितले जाते. युरोपमधील ग्राहक, शेतकरी व शास्त्रज्ञ मात्र प्राणपणाने ह्या तंत्रज्ञानाला विरोध करीत आहेत. त्या विरोधाची मीमांसा करणारा हा लेख मोन्सॅन्टोसाठी महाप्रचंड ‘सीड हब’ उभारण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच …

शेतीची सद्यःस्थिती व पर्यायी दिशा

शेती व शेतकरी यांची सद्यःस्थिती सामान्य नागरिकांनीदेखील समजून घेणे, या प्रश्नाविषयी संवेदनशील होणे व यावर स्थायी उपाय सुचविण्यासाठी आपलाही वाटा उचलणे गरजेचे आहे. १.०. शेतीची सद्यःस्थितीः १.१. शेतजमीनधारणाःआपल्या देशातील लागवडीखाली असलेल्या जमीनधारणेचा विचार करता खाली चित्र दिसते. जमीनधारणा प्रकार  जमीनधारक कुटुंबांची संख्या %  त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्रफळ % अत्यल्प (१ हेक्टर खालील)  ५९.४ १५. अल्प (१-२ …

सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील …