निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)
भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही. पण …