अज्ञानकोश
पुस्तकांमधील ‘शामची आई’ जशी आठवणीत आहे; तशी कित्येक पुस्तकंसुद्धा. अशीच एक आठवण. मी लहान असताना एकदा शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) बाबांचं काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराड्यातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, …