डॉ. सुधाकर देशमुख - लेख सूची

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (३)

८. सांस्कृतिक परिणामटेलिव्हिजन, इंटरनेट आणि वृत्तपत्रे ह्यांमुळे जगात घडणाऱ्या घटना काही सेकंदांत जगभर प्रसारित होत आहेत. क्रिकेटचा चालू असलेला खेळ आपण आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात नित्य बघत असतो. ह्या माध्यमांतून बातम्या, टेलिव्हिजन मालिका, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ आणि जाहिराती इत्यादींतून अनेक प्रतिमा प्रसारित होत असतात. माध्यमांनी दाखविलेल्या ह्या प्रतिमांत आपण इतके गुरफटून गेलेले असतो की वास्तव …

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (२)

ह्यापूर्वी उल्लेखिलेल्या सर्व बाबींमुळे आता कंपन्या आंतरराष्ट्रीय न राहता ट्रान्सनॅशनल (राष्ट्रातीत) झाल्या. ह्या कंपन्याची राष्ट्रीय निष्ठा ही भावनिक असत नाही. ती फक्त कायदेशीर असते. कॉम्प्युटरच्या एका बटनवर लंडन, टोकियो किंवा न्यूयॉर्कशी नुसते संबंधच प्रस्थापित होतात असे नव्हे तर क्षणार्धात चलन, स्टॉक्स, शेअर्स आणि वायदेबाजार ह्यांच्यात देवाणघेवाण शक्य झाली आहे. मोठ्या कंपन्याची भांडवलशक्ती, तिच्या मागे असलेली …

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा …

देशभक्ती आणि राष्ट्रवाद

देशभक्ती (patriotism) आणि (nationalism) ह्या दोन शब्दांत फरक आहे. त्यांचा अर्थ आणि संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्यांचा योग्य वापर होणार नाही. ह्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण आपल्या अस्मितेचा अभ्यास केला पाहिजे. आपली अस्मिता ही आपल्या स्वप्रेमावर आधारित असते. मी, माझे देशबांधव, समाज ज्याच्याशी मी रक्ताच्या नात्याने बांधला गेलेलो आहे त्याच्यावरच्या प्रेमामुळे सर्व समाजाला ‘आम्ही’ म्हणले …

पर्यायी विकासनीतीची ओळख

नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने चर्चिल्या गेलेल्या अनेक प्रश्नांबरोबर पर्यायी विकासनीतीचा उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो. प्रचलित विकासनीतीसंबंधाच्या असमाधानातून पर्यायी विकासनीती गेली कित्येक वर्षे मांडली जात आहे. पर्यावरण-वाद्यांचे एक नवीन फॅड आहे’ ह्या मतापासून ‘पर्यायी विकासनीती’ हीच शाश्वत विकासनीती आहे आणि त्याशिवाय तरणोपाय नाही ह्या मतापर्यंत ह्या संबंधात अनेक मते मांडली जातात. पण पर्यायी विकासनीती म्हणजे …

वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

दिल्लीस्थित आयुर्विज्ञान संशोधनसंस्थेत डॉक्टरला झालेली मारहाण आणि लगेच दोन दिवसांनी ठाण्यात आनंद दिघे ह्याच्या निधनानंतर सिंघानिया रुणा-लयाची झालेली मोडतोड आणि जाळपोळ ह्या दोन घटना वैद्यकीय व्यवसाय आणि समाज ह्यांच्यातील अस्वस्थ संबंधांवर प्रकाश टाकतात. एकेकाळी समाजाच्या मानास प्राप्त असलेल्या ह्या व्यवसायाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. प्रतिपरमेश्वर अशी असलेली त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. या …