तारक काटे - लेख सूची

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे — बीज-संवर्धनाचे महत्त्व

वनस्पतीः वैविध्य व अन्न आज जगभरात वनस्पतींच्या जवळपास ३२,८३,००० प्रजातींची नोंद झाली आहे. यांपैकी २,८६,००० प्रजाती केवळ सपुष्प वनस्पतींच्या आहेत. उर्वरित प्रजातींपैकी रानात नैसर्गिक स्वरूपात वाढणाऱ्या अथवा लागवड होणाऱ्या अशा अंदाजे ७००० प्रजातींचा वापर अन्न म्हणून करण्यात येत आहे. निसर्गात सतत बदलांना तोंड देताना वनस्पतींच्या आनुवंशिक (गुणसूत्रांच्या) रचनेत दर पिढीमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. कधी …

भारतासाठी धडे

क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकात रेखाटलेल्या अमेरिकन शेती-इतिहासापासून भारतीय शेतीच्या संदर्भात खूप काही शिकण्यासारखे आहे. बाजारव्यवस्थेचे शेतीव्यवहारातील जबरदस्त नियंत्रण व त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक; शेतमाल उत्पादन व वितरण यांत गुंतलेल्या बड्या कंपन्यांमुळे उत्पादनप्रक्रियेतून उखडला गेलेला छोटा शेतकरीवर्ग; विकसित देशांमधील शेतीतील मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे व रसायनांच्या वापरामुळे शेतीमाल उत्पादनात प्रतिहेक्टरी झालेली …