दिलीप करंबेळकर - लेख सूची

उजवा प्रतिक्रिया वाद की स्व-अस्तित्वाची लढाई?

मे२०१४मधीलसत्तांतरानंतरसार्वजनिकचर्चाविश्वातजोमानेसुरूझालेल्यासहिष्णुता-असहिष्णुता, पुरोगामी-प्रतिगामीयावादांच्यापार्श्वभूमीवरडाव्या ’लिबरल्स’चंपरखडमूल्यमापनकरणारालेख. ——————————————————————————– ‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्‍या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्‍याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. …