दि.य.देशपांडे - लेख सूची

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास. धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध …