धनंजय काशिनाथ मदन - लेख सूची

काही कविता

(१) येणारा काळ कठीण असेल चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेयएक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंयटाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊनउपकाराची फेड केली जातेय,हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय. दिवे लावा, दिवे मालवा म्हणतदेशाला जागं केलं जातंयअंधाराची अफू देऊन प्रकाशाला दूर पळवलं जातंय कित्येक अडकलेले, दूर कोठे घरापासूनआपली माणसं, आपलं गावपाहिलं नाही डोळे भरून. अशांचा काही विचार हवाभरीव रोकडे धोरण आखा. …