नी. र. वऱ्हाडपाण्डे - लेख सूची

समाजवादी स्मृती

भाबडे अर्थशास्त्रः १)मे २००५ चा आजचा सुधारक गिरणी विशेषांक म्हणून निघाला आहे. यातील काही भागाबद्दल “संघटित क्षेत्रातील १२-१५ टक्के श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ७ % दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी सम्पत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे …

समतेचे मिथ्य

सुधारणेची चर्चा करायची तर मूल्ये कोणती मानायची हा प्रश्न मूलभूत महत्त्वाचा ठरतो. कारण आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे यालाच सुधारणा म्हणतात व चांगलेआणि वाईट हा मूल्यांचा विचार आहे.सुधारणेच्या बाबतीत समता हे मूल्य असल्याचा वारंवार उद्घोष करण्यात येत असतो. असा उद्घोष करणार्‍यांमध्ये अर्थमीमांसा करून युक्तिवाद करण्याचा दावा करणारे लोकही अन्तर्भूत आहेत.पण समता या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण …

चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध …

श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

मानवाला जे ज्ञान प्राप्त होते ते फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी होते. या प्रमाणांच्या पलीकडे साक्षात्कार नावाचे एक प्रमाण आहे, त्याने होणारे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होणार्‍या ज्ञानापेक्षा अधिक प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी झालेले ज्ञान साक्षात्काराने झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी झालेले ज्ञान खोटे मानावे; शिवाय साक्षात्काराने …

चर्चा -गीता, मनुस्मृति व प्राध्यापक देशपांडे

ऑगस्ट ९२ च्या आजच्या सुधारकमध्ये प्रा. देशपांडे यांनी त्यांच्या गीतेवरील लिखाणावर मी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिल्याचा दावा मांडला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतेने नीतीच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली नसून देशपांड्यांनी मात्र माझ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. दोन कर्तव्यांत संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर त्यांना गीतेत सापडत नाही, मी दाखवून दिल्यावरही सापडत नाही. …

इहवाद व हिंदू राष्ट्र

१९४७ च्या सत्तान्तरानन्तर आमचे राज्य secular आहे असे म्हणण्यास पं. नेहरूंनी सुरवात केली. वस्तुतः आमच्या संविधानात, हा प्रचार सुरू झाला तेव्हा secular हा शब्द नव्हता. तो पुढे इन्दिरा गांधीनी घातला. आज बहुधा सर्व पक्षांची secular म्हणवून घेण्यात अहमहमिका लागली आहे. असे असले तरी या शब्दाच्या अर्थाबद्दल मात्र विलक्षण गोंधळ आहे. काँग्रेसजन साधारणतः secular च्या विरुद्ध …