पत्रसंवाद
ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. …