पी. साईनाथ (अनुवाद - टी.बी. खिल्लारे) - लेख सूची

अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे ‘प्रत्युत्तर’ चुकीचे का होते

मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?” अशा प्रकारचा युक्तिवाद अनेक …