नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी
नास्तिकता हा शब्दप्रयोगच आपल्यासारख्या विचार करून निर्णय घेणाऱ्यावर, न्यायोचित व नैतिक कृती करणाऱ्यावर अन्याय करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण नास्तिक हा शब्द सामान्यपणे आस्तिक नसणाऱ्यांसाठी म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसाठी वापरला जातो. परंतु नास्तिकता फक्त परमेश्वर ही संकल्पनाच नव्हे तर या संकल्पनेच्या अवतीभोवती असलेल्या एकूणएक गोष्टी नाकारत असते. परमेश्वर या संकल्पनेभोवती असलेल्या बहुतेक …