आहे मनोहर तरी…
आजवर जी कामे मानवी बुद्धिमत्तेच्या वापराशिवाय शक्य नव्हती अशी कामे यंत्रांकरवी करून घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रणालीस कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणतात. यात मशीन लर्निंग, पॅटर्न रेकग्निशन, बिग डेटा, न्यूरल नेटवर्क्स, सेल्फ अल्गोरिदम इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक संगणक वापरून आधुनिक काळातच संग्रहित प्रोग्रामद्वारे विकसित केले गेले असले तरी या संकल्पनेचा उगम …