प्रा. श्री. गो. काशीकर - लेख सूची

‘धारणाद्धर्म इत्याहुः’ – प्रा. देशपांडे यांना उत्तर

धर्म म्हणजे रिलिजन नव्हे; धर्माचे मुख्य स्वरूप समाजधारणेचे म्हणजे ऐहिक स्वरूपाचे आहे ह्या माझ्या विधानाच्या समर्थनार्थ माझ्या लेखात मी धर्मशास्त्राचे गाढे व्यासंगी व विद्वन्मान्य लेखक भारतरत्न म. म. डॉ. पां. वा. काणे यांनी केलेली धर्माची व्याख्या उद्धृत केली होती. (आजचा सुधारक, फेब्रु. १९९३). परंतु प्रा. देशपांडे यांना ती विचारात घेण्यासारखी वाटली नाही. त्यावर त्यांची टीका …

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान …