प्र. ब. कुळकर्णी - लेख सूची

संपादकीय संवाद : ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक, स.न.वि.वि.विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् …

संपादकीय संवाद ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक, स.न.वि.वि. विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, …

आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे …

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!! आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा …

संपादकीय प्र.ब.कुळकर्णी

प्रिय वाचक, ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे …

पुस्तक परीक्षण कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती …

प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन

[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.] प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो …

सुधारक दि. य. देशपांडे

मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे. प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली …

हसरी किडनी अर्थात् ‘अठरा अक्षौहिणी’ [लेखिका : पद्मजा फाटक, अक्षर प्रकाशन मुंबई, पृष्ठे बावीस + ४३७]

‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणा-सारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. …

अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद (२)

आ.सु.च्या वतीने सर्व चर्चकांचे आभार मानणे आणि काही आणखी खुलासे करणे ही कामे उरली होती. आप्तवचन तुम्ही मानत नाही. पण धर्मग्रंथांतून तुम्ही वेळोवेळी वचने उद्धृत करता हे कसे असा एक आक्षेप या पूर्वीच्या व्याख्यानात, ‘विवेकवाद धर्माची जागा घेऊ शकेल?’ या विषयावर बोलताना घेतलेला होता. आजच्या चर्चेतही श्रद्धेची दृढनि चयाशी गफलत करून टीका झालेली होती. त्या …