विवाह आणि नीती – उपसंहार
आपल्या चर्चेतून आपण काही निष्कर्षाप्रत आलो आहोत. यांपैकी काही निष्कर्ष ऐतिहासिक आहेत, तर काही नैतिक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता आपल्याला असे आढळले की आज नागरित समाजात लैंगिक नीती ज्या स्वरूपात आहे, ते स्वरूप तिला दोन भिन्न स्रोतांमधून प्राप्त झाले आहे. एका बाजूला पितृत्व निश्चित करण्याची पुरुषांची इच्छा, आणि दुसर्या बाजूला प्रजननाखेरीज अन्यत्र लैंगिक संबंध पापमय …