विक्रम आणि वेताळ – भाग ९
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.” “तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.” “बरं,बाबा, तसं म्हण. खूश?तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची …