मे. पुं. रेगे - लेख सूची

स्वातंत्र्य, समता आणि न्यायः

आरक्षण-विरोधी मानसिकता वर उल्लेख केलेली उदाहरणे मासलेवाईक असून जात-आरक्षणासंबंधी समाजातील मानसिकता कशी आहे यावर प्रकाश टाकू शकतात. आज औपचारिकरीत्या सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणाचे धोरण मान्य केले आहे. परंतु ही औपचारिक संमती व्यावहारिक पातळीवर कुचकामी ठरत आहे. काही अपवाद वगळता उच्च जातीतील राजकीय नेते व नोकरशाही समन्वयवादी भूमिकेतून या प्रश्नाकडे बघत आहे की काय असा संशय …