न्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता
आज भारताची लोकसंख्याच इतकी आहे की जवळजवळ रोजच बलात्काराची बातमी वाचायला मिळते. बातमी आली की लगेच “पोलीस काय झोपा काढतात का?” अशी ओरड सुरू होते. आपल्याला कल्पना आहे का की संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) स्टँडर्ड्सनुसार दर १००,००० लोकसंख्येला २३० पोलीस असायला हवेत. भारतात पोलिसांची ही संख्या फक्त १२५ आहे. ही संख्या जगातील सर्वात कमी श्रेणीत …