लिओनार्डो डा व्हिन्ची
सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा …