मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology- IBT)
विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. तीमधील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षण केल्यानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या एका वर्षाच्या DBRT (Diploma in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये यासाठी आश्रमाची अध्यापनपद्धत शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना तिचा फायदा व्हावा; …