राजराहुल (राहुल खंडाळे) - लेख सूची

कवीची कैद

इथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैदतशी कवीची कैद फार सामान्य झाली सांप्रतकाळीकदाचित म्हणून कविता लिहिताना कवीलातोल सांभाळत लिहावं लागतं मन आणि लेखणीचा, जाम कसरत करावी लागते कवितेचा एकेक शब्द कागदावर उतरवतांना त्याला जपून लिहावे लागतात शब्द प्रतिमा-प्रतीकं म्हणूनत्याला जपून वापरावे लागतात कवितेच्या पोस्टरचे रंगचुकून कधीतरी लाल, निळा, हिरवा इ. इ.किंवा तत्सम रंग …

हळूच

हळूच कशा एका रात्रीत आठेक वाजता एका दमातचलनात असलेल्या नोटा अलगद फेकल्या जातात चलनाबाहेरहळूच कशी आणली जातात मनमानी विधेयकं आणि कायदेहळूच कसे दडपले जातात संप, आंदोलने आणि मोर्चेहळूच कसे निर्मिले जातात कोंडवाडे, डीटेंशन सेंटर्स कोंडावया अल्पसंख्य हळूच कसे बोलू लागतात पुढारी पाच वर्षानंतर मिठू मिठूहळूच कशी उतरवली जाते गळ्यात मन की बातहळूहळू प्रोपगंडे जगू लागतो …