भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका
अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते. मग भौतिक जग नियत …