पर्यावरणाचा तोल बिघडविणारे आम्ही करंटेच…..
गेल्या काही वर्षांतील एकंदरीत नैसर्गिक परिस्थिती जर आपण अवलोकन केली तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. अनपेक्षित असा कसाही ऋतूबदल प्रकर्षाने जाणवत असतो. कुठे अपेक्षेपेक्षा कमी तर कुठे धोधो सतत कोसळणारा पाऊस, कुठे परिसर भाजून काढणारा उष्मा आणि कुठे कडाक्याची थंडी बेजार करून सोडते. आतापर्यंतचे चालत आलेले प्रमाणबद्ध निसर्गचक्रच बिघडलेले स्पष्टपणे लक्ष्यात येत आहे. …